माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वर्चस्वास सुरुंग!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर तालुक्‍यातील मांजरसुंबा, डोंगरगण ग्रामपंचायतीच्या दोन रिक्त जागांवर आमदार प्राजक्त तनपुरे गटाच्या दोन सदस्यांची वर्णी लागली आहे.

हे पण वाचा :-  वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत मुलीवर बलात्कार !

त्यामुळे गेल्या 25 वर्ष कर्डिले गटाचे वर्चस्व असणाऱ्या ग्रामपंचायतीलाच सुरुंग लागला असून, तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील आगामी होणाऱ्या निवडणुकीत मोठा बदल होणार असल्याचे बोलले जात आहे.

हे पण वाचा :-  फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

मांजरसुंबा, डोंगरगण ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक नुकतीचपार पडली. यात तनपुरे गटाचे दादू हरी वाघमारे, व डोंगरगण येथील प्रनिता अनिल कदम यांची वर्णी लागली. अनेक दिवसापासून ही जागा रिक्त असल्याने ही निवडणुक झाली.

हे पण वाचा :- बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याची ही जबाबदारी नाकारली !

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळविला.

हे पण वाचा :- महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या फ्लॅटवर जाऊन बलात्कार !

गेली 25 वर्ष नगर तालुक्‍यातील ग्रामपंचायतीवर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले गटाचे वर्चस्व होते. त्यांचा नुकताच विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतेला ही सुरुंग लागला आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास

त्यामुळे आगामी निवडणुकीत तनपुरे गटाचे वर्चस्व येइल का? अशी चर्चा पारावर रंगत आहे. ही निवडणुक राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, नंदकुमार गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरसुंबा येथील पंढरीनाथ कदम, डॉ. राम कदम, विश्‍वास कदम तर डोंगरगण येथील संतोष पटारे यांनी काम पाहिले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment