Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

80 लाख रुपयांच्या दूध पावडरसाठी झाला त्या ट्रक चालकाचा खून,धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निबंळक बायपास येथे दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या करून ट्रक व त्यामधील दूध पावडर नेणारी दरोडेखोरांची टोळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणीहून जेरबंद केली.

हे पण वाचा ; शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर !

त्याच्या कडून ७३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. 31 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास नवनाथ वलवे (रा. सारोळा कासार, ता. नगर) यांचा खून झाला होता.

हे पण वाचा ; अहमदनगर ब्रेकिंग : आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला

वलवे यांच्या खुनानंतर 80 लाख रुपयांची दूध पावडर असलेली मालट्रक गायब होती. त्यामुळे दूधपावडर तस्करीतून हा खून झाल्याचा संशय पोलिसांना होता.

हे पण वाचा ; नौकरी अपडेट्स : सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.

हे पण वाचा ; अहमदनगर जिल्ह्यातील हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

पुणे, सोलापूर व मुंबई येथून सहा संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्यांनी हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधितांना अटक करण्यात आली आहे.

हे पण वाचा ; प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते…

दिलीप अशोक मुंढे (रा.सोनहिवरा, ता.परळी, जि.बीड ह.रा.इंद्रायणीनगर, सेक्टर नं.३, बिल्डिंग नं.५३, भोसरी, ता.हवेली, जि.पुणे), रोहित उर्फ दाद्या शहाजी बनसोडे ( रा.शिरसागरनगर, ढवळस, ता.माढा, जि.सोलापूर,),

हे पण वाचा ; माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वर्चस्वास सुरुंग!

महेश मोहन शिंदे (रा.जगदाळे नगर, कुर्डुवाडी, ता.माढा, जि.सोलापूर), ज्ञानेश्वर उर्फ सोनू विष्णू राऊत (सूतार आळी, ढवळस, ता.माढा, जि.सोलापूर), शिवाजी धनाजी पाटील (रा.पाटील वस्ती, उजनी, सोलापूर),

हे पण वाचा ; विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकारणातील धक्कादायक माहिती समोर

शाहीद इस्माईल शेख (रा.व डजी, ता.वाशी जि.उस्मानाबाद, ह.रा.गंधर्वनगर, मोशी, ता.हावेली जि.पुणे) अशी पकडण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button