महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे दिल्लीत झाले हाल, करावा लागला या गोष्टींचा सामना !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिल्लीत त्रास झाला, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा त्याना चांगलाच फटका बसला.

आचारसंहितेचे कारण देत महाराष्ट्र सदनाने थोरात यांना वाहन नाकारले. त्यामुळे थोरात यांची गैरसोय झाली.

मात्र बाळासाहेब थोरात यांच्याकडून महाराष्ट्र सदनात राहण्यासाठी मात्र राजशिष्टाचारानुसार केवळ ५०० रुपये शुल्क घेण्यात आले.

थोरात पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी आले होते. विमानतळ ते महाराष्ट्र सदन, सदन ते काँग्रेस नेत्यांचे निवासस्थान कार्यालयात यासाठी थोरात यांनी खासगी वाहन वापरले.

प्रचारासाठी आलो नव्हतो सरकारी नियम असतात पण ते केव्हा लागू करायचे, याचा विचार व्हायला हवा. मी दिल्लीत प्रचारासाठी आलो नव्हतो. त्यामुळे मला सरकारी वाहन मिळायला हवे होते. – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment