२० फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोहित पवारांच्या मतदारसंघात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सरकारची प्रत्येक योजना गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. यात हलगर्जीपणा केला, तर गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.

सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय योजना घरपोहोच करण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत महावीर भवन येथे आमदार पवार यांनी तालुक्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

सरकारची प्रत्येक योजना गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. राज्य सरकार अनेक लोकोपयोगी योजना राबवते, पण त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचतातच असे नाही.

रेशनकार्ड न मिळणं, प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगले उपचार न मिळणं, रेशन दुकानात पुरेसे धान्य न मिळणं, घरकुल अशा अनेक गोष्टींसाठी नागरिकांना झगडावे लागते. लाभार्थ्यांची निवड करण्यापासून योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यापर्यंत नियोजन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान २० फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विविध मान्यवर महाराजस्व अभियानांतर्गत विविध विभागांच्या प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असे आमदार पवार म्हणाले.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, महावितरणचे कासलीवाल, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. युवराज खराडे,

तालुका आरोग्य अधिकारी सुनील बोराडे, कृषी अधिकारी सुधीर शिंदे, उपाधीक्षक भूमिअभिलेख मनीषा धीवर, आगारप्रमुख महादेव शिरसाट, तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment