महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोल्हार महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने संगमनेरजवळील दुधेश्वर मंदिर परिसरात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

दत्तात्रय चंद्रहंस लोंढे (१९, कोल्हार खुर्द) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी दत्तात्रय महाविद्यालयात हजर होता. नंतर तो मोटारसायकल घेऊन दुधेश्वर महादेव मंदिराजवळ गेला.

शर्ट व स्वेटर झाडाला बांधून त्याने गळफास घेतला. त्याने आत्महत्या केली की, घातपात झाला, एकतर्फी प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केली? याविषयी परिसरात कुजबुज सुरू आहे.

या विद्यार्थ्याने आत्महत्याच केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दत्तात्रय हा एकुलता एक मुलगा होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास आश्वी पोलिस स्टेशनचे वाघमारे करत आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

Leave a Comment