जनतेने दिलेले ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेकजण मोठमोठे हारतुरे आणि जेसीबीतून गुलालाची उधळण करीत होते पण आम्ही शिर्डी मतदार संघात सर्वसामान्य माणसासाठी काम सुरू केले. विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे आठशे व्यक्तींना लाभ मिळवून दिला. काम करण्यास देत असलेल्या प्राधान्यामुळेच लोकांनी दिलेले ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील यांच्यासाठी कोणत्याही इतर पदापेक्षा सर्वात मोठे असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातुन राहता तालुका तहसील कार्यालय, कृषिविभाग,पंचायत समिती यांच्या वतीने श्रावणबाळ वृध्दपकाळ योजना, इंदिरागांधी वृध्दपकाळ योजना,राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, मोफत अपघात विमा योजनेचे धनादेश, आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, कृषि विभागामार्फत ट्रॅक्‍टर व राष्‍ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य, संजय गांधी, महिला बचतगट आदि योजनेतील मंजुर लाभार्थ्‍यांना चेक व प्रमाणापत्राचे वितरण तसेच पशु वैद्यकीय विभागामार्फत शेळी व गायी गट वाटप करताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.

या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, सभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे, माजी सभापती सौ. हिराताई कातोरे, प्रवरा बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, व्हाईस चेअरमन पोपटशेठ असावा, पोपटराव लाटे, प्रातांधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, जिल्‍हा परिषद व पंचायत समिती सदस्‍य आदि मान्यवर उपस्थित होते.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील निवडणुकीमध्ये ७५ हजारांचे मताधिक्य येथील सर्वसामान्य जनतेने दिल्याने त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जेवढ्या योजना राबविता येतील यासाठी प्रयत्न केला. रेशन कार्ड नाही असे एकही कुटुंब मतदारसंघामध्ये शिल्लक राहिले नसून कुठल्याही खर्चाशिवाय आशा योजना सर्वसामान्य लाभार्थीच्या हातात देणारा शिर्डी हा एकमेव मतदारसंघ असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, आज राज्यामध्ये तीन पक्षांचे सरकार आहे. आपल्याला मिळालेल्या खात्याद्वारे काय काम करायचे हे माहित नसताना केवळ मंत्रिपद पदरात पाडून घेण्याची धडपड आपण सर्वानी पाहिली आहे.

विखे पाटील यांच्या कडे कोणतेही पद नाही, आता काय होणार याची चिंता अनेकांना लागली आहे. परंतु सतत लोकांमध्ये राहून काम करण्याची विखे पाटील कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने जनतेचा आशीर्वाद हाच आमच्या कुटुंबासाठी महत्वाचा आहे. इतर ठिकाणी पडझड होताना लोकांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना ९० हजाराच्या मताधिक्याने निववडून दिले म्हणूनच खासदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या मार्गदशनाखाली काम करताना विविध योजनाबरोबरच मतदारसंघातील एकही कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही असा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांसाठी हा कसोटीचा काळ असल्याने कोणीही चलबिचल होऊ न देता सर्वसामान्य गरीब माणसासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन करतानाच आ. राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच मतदारसंघाचा दौरा करणार असून, वाडीवस्ती वरील प्रत्येक व्यक्तींच्या अडचणी ते समजून घेणार आहेत. कार्यकर्त्यांनीही सामान्य नागरिक आणि आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घडवून सर्वांच्या समस्या जाणून घ्याव्यात.

नगर दक्षिणेचा लोकप्रतिनिधी असल्याने शिर्डी मतदारसंघाप्रमाणेच नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात योजनांची अंमलबजावणी करायची आहे.तरीही शिर्डी मतदार संघात जास्त वेळ देता येणार नसला तरी १५ दिवसातून एकदा नागरिकांसाठी आपण भेटणार असल्याचे खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment