प्रजासत्ताक दिनी आसाम हादरलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / गुवाहाटी : आज आसाम चार शक्तिशाली ग्रेनेड हल्ल्यांनी हादरलं आहे . चारपैकी तीन हल्ले हे दिब्रूगड येथे झाले तर, एक हल्ला चरैदेव जिल्ह्यात झाला. ज्यामुळे आज  सकाळी आसाम अक्षरश: हादरलं.

https://twitter.com/ANI/status/1221268938119532545

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार  एका दुकानाजवळ एक स्फोट झाला, ज्या ठिकाणी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तर दुसरा एक स्फोट दिब्रूगड येथील गुरुद्वाऱ्यापाशी झाल्याची माहिती समोर येत आहे. 

https://twitter.com/ANI/status/1221272116625981440

दुलीयाजान येथे झालेल्या आणखी एका स्फोटाची माहितीही पोलिसांना मिळाली. ज्याचा तपास अद्यापही सुरु आहे. विविध ठाकाणी झालेल्या या स्फोटांची माहिती मिळताच पोलीस पथकांनी तातड़ीने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment