हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो – थंडीत भल्या पहाटे अजित पवारांची टोलेबाजी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नाशिक : अजित पवार सकाळी सकाळी इतक्या लवकर येईन का, अशी चर्चा होती. मात्र त्यातील एक जण म्हणाला काही सांगता येत नाही हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच हास्याचे कारंजे उडवले.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी सकाळी लवकर भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावल्याने आयोजकांचीही तारांबळ उडाली. मला आमदार सांगत होते.

काही जण चर्चा करत होते, मी सकाळी इतक्या लवकर येईन का, त्यावर दुसरा म्हणाला, हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो, असं अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अजित पवार दिंडोरीतील कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी अजित पवारांनी नोव्हेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीसांच्या साथीने सकाळी सात वाजता घेतलेल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथ सोहळ्याची आठवण काढली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment