19 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगात स्टील रॉड टाकून बलात्कार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नागपूर परिसरात घडली आहे. 19 वर्षीय तरुणीला स्प्रे मारून बेशुद्ध करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

क्रूरतेचा कळस गाठणा-या या नराधमाने पीडित तरुणीच्या गुप्तांगात स्टील रॉड टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

संस्थेतील सहकारी कर्मचाऱ्याच्या 19 वर्षीय बहिणीवर आरोपीने रात्रभर अत्याचार केला. यानंतर पहाटेच्या सुमारास युवतीच्या गुप्तांगात स्टीलचा रॉड टाकला. पोलिसांनी योगीलाल रहांगडाले (वय 52) या नराधमाला अटक केली आहे.

तरुणीने विरोध केल्याने नराधम योगीलालने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. ती काही क्षणातच बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर रात्रभर बलात्कार केला.
पहाटेच्या सुमारास योगीलालने मानवतेची सीमा पार करून तरुणीच्या गुप्तांगात स्टीलचा रॉड टाकला. शुद्धीवर आल्यानंतर तिने मोठ्याने किंचाळी फोडली.
शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्यामुळे तिचा जीव वाचला. तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व तिचा भाऊ पारडीतील एका संस्थेत काम करतात. याच संस्थेत रहांगडाले हा पर्यवेक्षक आहे. संस्थेलगतच असलेल्या एका खोलीत पीडित तरुणी, तिचा भाऊ, अन्य एक तरुणी व रहांगडाले राहतो.

21 जानेवारीला तरुणीचा भाऊ गावाला गेला. अन्य एक तरुणीही बाहेरगावी गेली. मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास रहांगडाले खोलीत आला. त्याने तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला.

ती बेशुद्ध झाली. ती बेशुद्ध होताच रहांगडालेने तिच्या गुप्तांगात स्टीलचा रॉड टाकला. त्यानंतर पहाटे 5 वाजतापर्यंत त्याने तरुणीवर अत्याचार केला व पसार झाला.

बलात्कारनंतर आरोपीने अत्यंत भयंकर कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिच्या गुप्तांगाला स्टील रॉडने देखील इजा पोहचवली.

ही घटना २१ जानेवारीला घडली. पण याप्रकरणी पीडित मुलीने २४ जानेवारीला पारडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment