अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेलचालकाच्या हत्येप्रकरणी श्रीगोंद्यातील आरोपीस अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील घारगाव शिवारातील हॉटेल प्राईडचे मालक अशिष चंद्रकांत कानडे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांची हत्या श्रीगोंद्यातील सुरेगावातील दरोडेखोर सगड्या उंबर्‍या काळे यांच्यासह त्याच्या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सगड्याला जेरबंद करण्यात आले आहे. 

अशिष कानडे यांच्या मालकीचे घारगावात हॉटेल आहे. तेथे ते 18 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे झोपले होते. रात्री दरोडेखोरांनी त्यांच्या हॉटेलच्या मागील बाजूची जाळीची साखळी व कुलूप तोडून मालक अशिष कानडे यांची हत्या करून तेथील 40 हजारांची रोख रक्कम व दारूच्या बाटल्या चोरून नेल्या होत्या. 

या घटनेची फिर्याद सुनील पवार यांनी घारगाव पोलिसांत दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. 

अशातच पवार यांना हा गुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील सगड्या काळे व त्याच्या साथीदारांनी केल्याची गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार माहिती घेतली असता सगड्या काळे हा सातारा जिल्ह्यात एका वीटभट्टीवरील त्याच्या ओळखीच्या मजुराकडे राहात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. 

त्यानंतर सगड्या काळेस ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता हा गुन्हा त्याचा भाऊ मिथून उंबर्‍या काळे रा. सुरेगाव व साथीदार पुणेवाडी, पारनेरातील संजय हातन्या भोसले यांनी केला असल्याची कबुली दिली. त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात आला मात्र ते मिळून आले नाहीत. सगड्या काळेस घारगाव पोलिसांकडे सोपविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment