तरुणाने काढली अल्पवयीन मुलीची छेड, मुलीने केली आत्महत्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील वडाळी येथे ३० जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

या प्रकरणी आजोबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

मृत मुलीच्या आजोबाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नात ही दहाव्या वर्गामध्ये उंद्री येथे शिक्षण घेत होती. ३० जानेवारी रोजी तिचा सराव पेपर असल्याने मैत्रिणीसह शाळा सुटल्यानंतर साडेदहा वाजता बसची वाट पहात उभी होती.

या वेळी गावातीलच आरोपी महादेव सीताराम देवकर (२२) याने मुलीला त्याच्या गाडीवर बसण्यासाठी जबरदस्ती करून तिची छेड काढली. रात्री साडे अकरा वाजता घरी पोहोचल्यानंतर मुलीने ही घटना आजोबाला सांगितली.

त्यानंतर मुलीचे आजोबा संबंधित मुलाच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले होते. त्याचवेळी मुलीने राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

आजोबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महादेव देवकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment