डॉ.विखे अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल टीम मेक्ट्राच्या इलेक्ट्रीक वाहनास भारतात तिसरा क्रमांक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर: वाढती लोकसंख्या, वाढती वाहने याच्या तुलनेत पेट्रोल व डिझेलचे मर्यादित साठे शिल्लक राहत असून, वाढती गरज लक्षात घेता भारत सरकारने इलेक्ट्रीक वाहनांवर आपले लक्ष केंद्रीत केल्याने भविष्यात याचा वापर वाढणार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी केले.

डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागाच्या ‘टीम मेक्ट्रा’ ने  बनविलेल्या इलेक्ट्रीक वाहनास महाराष्ट्रात दुसरा तर  भारतात तिसरा क्रमांकाचे मानकरी ठरल्याबद्दल विद्यार्थ्यांचा फौंडेशनच्यावतीने जाहीर सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.नाईक बोलत होते. या सोहळ्यास विभागप्रमुख डॉ.किशोर काळे, इलेक्ट्रीकल विभागाचे  प्रा.सतीश मरकड, प्रा.चंदना शाह, प्रा.प्रियंका राऊत, प्रा.ज्योती बोटकर आदि उपस्थित होते.

डॉ.नाईक पुढे म्हणाले, वाढत्या लोकसंख्येमुळे दुचाकी वाहनांची मागणी वाढत आहे. एका घरात चार व्यक्ती असल्या तरी त्यांच्याकडे चार वाहने आहेत. अशी परिस्थिती आहे. यामुळे भविष्यात पेट्रोल, डिझेलचे दर  वाढतील, मर्यादित साठे शिल्लक असल्याने वाहनांची वाढती गरज लक्षात घेऊनच सरकारने इलेक्ट्रीक वाहनांवर लक्ष केंद्रीत केल्याने मेकॅनिकल इलेक्ट्रीक विभागाचे विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमामुळे त्यांनी तयार केलेल्या वाहनाला भारतात तिसरा क्रमांक मिळाल्याने  कॉलेजचे नाव देशपातळीवर उंचावले याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले.

प्रास्तविकात विभागप्रमुख डॉ.किशोर काळे यांनी सांगितले की, एएमटी मोटेा कॉर्पस् व अ‍ॅटम मोटार्स यांच्या संयुक्त विद्यमाने ई-बाईक रेसिंग चॅलेज स्पर्धेचे छत्तीसगड येथील ओ.पी.जिंदल युनिव्हर्सिटीमध्ये देशातील विविध राज्यांमधून अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश,  तामिळनाडू, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमधून विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित इलेक्ट्रीक मोटारसायकलचे प्रदर्शन तसेच त्यांना टेक्निकल इन्स्पेक्शन,  डिझाईन इन्स्पेक्शन, डायनामिक राऊडस् यांचा सामना करावा लागला. यामध्ये आपल्या कॉलेजच्या टीम मेक्ट्राने सहभाग  नोंदवून 120 ते 150 कि.मी. अंतरापर्यंत चालणारी इलेक्ट्रीक मोटारसायकल स्पर्धेत उतरुन राष्ट्रीय स्तरावर यश मिळविले असल्याचे सांगितले.

या टीममध्ये पवन वैद्य, अरबाज सय्यद, अजमत सय्यद, अनिकेत वांढेकर , सुदर्शन जाधव, हर्षल तांबोळी, फरमान शेख, तेजल वड्डेपल्ली, दुर्वेश खटके, नाजनीन शेख, ऋतुजा शिंदे, करण शिंदे, अदित्य कटारिया, वैभव जाधव यांचा समावेश होता. या सर्वांचे संस्थेचे मुख्य कार्य.अधिकारी डॉ.खा.सुजय विखे, सेक्रेटरी जन डॉ.बी.सदानंदा, डायरेक्टर  टेक्नि. डॉ.पी.एम.गायकवाड, उपसंचालक सुनिल कल्हापुरे, प्राचार्य उदय नाईक यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment