हे सुंदर हस्ताक्षर पाहून तिसरीतील या मुलीचे जयंत पाटलांकडून कौतुक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : तिसरीत शिकणाऱ्या श्रेया सजन या मुलीचं हे सुंदर हस्ताक्षर पाहून चक्क  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तिचे  कौतुक केलं आहे. ती राहुरीमधील कडूवस्ती या जिल्हा प्राथमिक शाळेत शिकते. 

गेल्या काही दिवसांपासून सुंदर हस्ताक्षर असलेला श्रेयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला बघता बघता हजारो लाईक्स आणि कमेंट मिळाल्या आहेत. 

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1225396987241148417

राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिसरीच्या इयत्तेत शिकणारी श्रेया सजन हिने जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत हे लिहिलं आहे.

शाईच्या पेनाने लिहिलेल्या हे पान सुंदर आणि वळणदार शब्दांनी गुंफल गेलं आहे. यातील एक एक अक्षर हे जणू मोत्यासारखं भासत आहे. यातील प्रत्येक शब्दाची ठेवण ही वेगवेगळी आणि नजरेस भरणारी अशी आहे.

https://twitter.com/prash_dhumal/status/1224925369419096065

जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत श्रेयाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर श्रेयाच्या वडीलांनी तिचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला. यावर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलं आहे.

या नंतर  श्रेयाच्या या अक्षराचे कौतुक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केलंय.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment