आ. संग्राम जगताप यांच्यामुळे बोल्हेगाव परिसराला आता शहराचा लुक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : शहराचे विस्तारीकरण व्हावे, यासाठी शहराला जोडणारे रस्ते, विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडुन मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. बोल्हेगाव, नागापुर हा परिसर पुर्वी ग्रामपंचायतमध्ये होता. तो नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेला आहे.

या भागाच्या विकासाला मुलभूत प्रश्नांपासुन सुरूवात केलेली असून नगरसेवक कुमार वाकळे यांच्या पाठपुराव्यामुळे हा परिसर वेगाने विकसित होत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातुन या पुढील काळात सीनानदीच्या कडेने डिपी रस्ता निर्माण करणार आहे.

हा रस्ता शहरातील मॉडेल रस्ता म्हणुन ओळखला जाईल, असे सुशोभिकरण केले जाणार असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.आ. जगताप यांच्या प्रयत्नातुन राज्य शासनाने सावेडी गाव ते बोल्हेगाव ते निंबळक बायपासपर्यंतच्या रस्त्याचे काम मंजुर केलेले असून या सुरू असलेल्या कामाची पाहणी आ. जगताप यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगरसेवक कुमार वाकळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पुढे बोलताना आ. जगताप म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन होत असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे एमआयडीसीत जाणारा कामगार वर्ग तसेच या परिसरातील रहिवासी नागरिकांना शहरात येण्याजाण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक वाकळे म्हणाले, आ. संग्राम जगताप यांच्यामुळे पुर्वी ग्रामीण भाग असलेल्या बोल्हेगाव परिसराला आता शहराचा लुक येऊ लागला आहे. 

Leave a Comment