महिलेला ट्रकने चिरडले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  दौंड महामार्गावरील अरणगाव बायपासजवळ अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने एका वृद्ध महिलेला चिरडले आहे.

यामध्ये इंदुबाई सखाराम शिंदे (वय 70) ही महिला जागीच ठार झाली आहे.

आरणगाव जवळील बायपास चौकातील नाटवस्ती नजीक हा अपघात पहाटे साडेसहा वाजता झाला.

या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. अरणगाव परिसरात गेल्या दीड महिन्यापासून अपघातांची मालिका सुरूच आहे.

यामुळे गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये अपघाताबाबत काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment