इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला तर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा अखिल भारतीय वारकरी मंडळ, भाजप अध्यात्मिक आघाडी व धार्मिक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

संगमनेर, अकोले, राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांनी इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. इंदोरीकर महाराज यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबन मुठे यांनी दिला आहे.

मुठे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सत्य निर्भीडपणे मांडून समाजाच्या अपप्रवृत्तीवर आसूड ओढणारे इंदोरीकर महाराज राजकारणापासून कायम दूर राहिलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे योग्य नाही.

त्यांच्यावर अशी कारवाई होणार असेल, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळ, भाजप अध्यात्मिक आघाडी व धार्मिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

कथा, कीर्तनकार यांचा अपमान करण्याच्या विरोधात कठोर कायदा करा, अशी मागणी करून इंदोरीकर महाराजांनी ग्रंथांमधील संदर्भ दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पुरोगामी मंडळी करीत आहे.

गुन्हा दाखल करणे व कारवाईची मागणी करणे म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे षडयंत्र आहे. ते फक्त कीर्तनकार, प्रचारक यांच्याच विरोधात केले जात आहे, हे आम्ही सहन करणार नसल्याचे मुठे यांनी केले आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment