माजीमंत्री पाचपुतेंच्या कारखान्याला आग लागून झाले ‘इतक्या’ कोटींचे नुकसान !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्यात सोमवार, दि.१७ रोजी दुपारनंतर लागलेल्या आगीत कोल बॅग व मशिनरी विभागाचे अंदाजे पाच ते सव्वापाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीचे कारण समजू शकले नसले तरी वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाने पेट घेतल्यामुळे ही आग लागण्याची श्यक्यता कारखाना व्यवस्थापक जरे यांनी बोलताना दिली. आग लागल्याचे समजताच श्रीगोंदा नगरपालिका व इतर तीन अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली. कारखान्याच्या कोल यार्डला लागलेल्या भीषण आगीत कारखान्याचे संपूर्ण कोल, बगॅस तसेच काही स्पेअरपार्ट्सचे अंदाजे पाच ते सव्वापाच कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबतची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी देण्यात आली आहे. यासंदर्भात कारखान्याचे संचालक विक्रमसिंह पाचपुते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतू संपर्क होऊ शकला नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment