नामदार बाळासाहेब थोरात विरोधकांना सपशेल अपयश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. थोरात यांच्या पॅनेलविरोधात उमेदवार देण्यात थोरात विरोधकांना सपशेल अपयश आले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याची निवडणूक मार्चमध्ये होणार होती. त्यासाठी उमेदवारी अर्ज मगे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. सुरुवातीपासूनच एकतर्फी असलेल्या या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना काहींची राजकीय साथ देखील मिळाली.

मात्र निवडणूक झाल्यास मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने ज्या काही विरोधकांनी उमेदवारी करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांनी आपले अर्ज मागे घेतले.दरम्यान सकाळीच मंत्री थोरात यांनी शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांची यादी अंतिम केल्यानंतर त्यांच्या संपर्क कार्यालयात सर्व इच्छुकांना बोलावत याची माहिती देण्यात आली.

अंतिम यादी निश्‍चित झाल्यानंतर उर्वरित सर्व इच्छुकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment