आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा ‘यू टर्न’ पुन्हा महाविकास आघाडीत ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. विखे पाटील आता भाजपची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा रंगत आहेत. 

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल आपल्या श्रीरामपूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डावरुन भाजप गायब होती.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात  भाजपचे जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणतेही नेते उपस्थित नव्हते.  विखेंच्या ऑफिसच्या उद्घाटनाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याने भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे, या कार्यक्रम स्थळी लावलेला एक फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. ‘चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर…’ असं या होर्डिंगवर लिहिलं होतं. याचा नेमका अर्थ काय घ्यावा, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment