केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना डी.लिट. पदवी प्रदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे आणि देशसेवेमुळे डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी. लिट. या पदवीने गौरव करण्यात आला.

नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये भव्य सोहळ्यात आठवले यांना डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) या पदवीने गौरवण्यात आले. या वेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील उपस्थित होते.

या वेळी रिपाइंचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. डी. लिट. पदवी प्रदान सोहळ्याचा क्षण आपल्या डोळ्यांत साठवण्यासाठी सीमाताई आठवले, कुमार जित आठवले, शकुंतलाताई आठवले, नंदाताई काशीकर यांसह संपूर्ण आठवले परिवार, आप्तजन तसेच सर्व क्षेत्रांतील आठवले यांच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी केली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment