संपत बारस्कर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी नगर महापालिकेत मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेला डावलून चक्क राष्ट्रवादीच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ टाकली आहे.

राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांची या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बारस्कर यांना या निवडीचे पत्र दिले.राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत सत्तेवर आलेल्या भाजपने बारस्कर यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन परतफेड केली आहे.

जेमतेम १४ जागांवर निवडून आलेल्या भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने सत्ता स्थापन करता आली. महापालिकेतील विरोधी पक्षनेता हे महत्त्वाचे पद मानले जाते. सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या शिवसेनेला हे पद मिळेल, अशीच शक्यत होती.

रंतु भाजपने शिवसेनेला डावलून राष्ट्रवादी काँग्रेसला हे पद दिले आहे. महापौर वाकळे यांनी मंगळवारी दुपारी बारस्कर यांना निवडीचे अधिकृत पत्र दिले.दरम्यान, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही विरोधी पक्षनेतेपदापासून डावलण्यात आल्याने शिवसेना काय भूमिका घेते याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. 

या वेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, उपमहापौर मालन ढोणे, सभागृहनेते स्वप्निल शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे, नगरसेवक कुमार वाकळे, दीपाली बारस्कर, पल्लवी जाधव, रवींद्र बारस्कर, सागर बोरुडे, निखिल वारे, अमोल गाडे, समद खान, मनोज कोतकर, सुनील त्र्यंबके, बाळासाहेब पवार, संजय चोपडा आदी उपस्थित होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment