बस आणि कंटेनर ट्रकमध्ये जोरदार धडक, 19 प्रवाशांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / चेन्नई : तामिळनाडूच्या तिरपुर जिल्ह्यात केरळ राज्य परिवहन मंडळाच्या बस आणि ट्रकमध्ये टक्कर होऊन भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, या बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. 

या अपघातात 19 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून  20 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

https://twitter.com/AHindinews/status/1230328607408418817

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास केरळ राज्य परिवहन मंडळाची एक बस कर्नाटकच्या बंगळुरुहून केरळच्या तिरुवनंतपुरम या ठिकाणी जात होती. यावेळी एक कंटेनर ट्रक कोयंबत्तूर-सलेम या महामार्गावरुन विरुद्ध दिशेने येत होता. यादरम्यान प्रवासी बस आणि कंटेनर ट्रकमध्ये जोरदार धडक झाली.

या बसमध्ये एकूण 48 प्रवासी प्रवास करत होते. यात 19 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बाकी प्रवाशी जखमी झाले. मृतांमध्ये 14 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment