अहमदनगर ब्रेकिंग : पत्रिकेत नाव न टाकल्याने तलवारीने वार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  नगर तालुक्यातील माळवाडी शिरढोण गावात असलेल्या श्री महादेव मंदिरात सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या आमचे नावे असलेल्या पत्रिका का वाटल्या नाही तसेच नवीन छापलेल्या सप्ताह कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आमची नावे का टाकली नाही.

असे म्हणत रामदास छबुराव वाघ , वय ६५ , जगदिश रामदास वाघ , सुनील मोहन वाघ , सर्व रा . माळवाडी शिरढोण यांना २१ जणांनी जमाव जमवून शिवीगाळ करत तलवारीने वार करून लोखंडी पाईपने मारुन लाथाबुक्क्याने मारहाण केली.

तसेच हॉटेलमधील सामानाची तोडफोड करुन जिवे ठार मारण्याची दिली , जखमी वृद्ध शेतकरी रामदास वाघ यांनी नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी दादा उर्फ गहिनीनाथ किसन दरेकर, सोनू उर्फ सुनील राजेंद्र दरेकर, किशोर माणिक रोहोकले, रमेशभाऊ वारे, सर्व रा. शिरढोण, गजानन भांडवलकर, रा. वाकोडी फाटा, नगर, अक्षय भिंगारदिवे, रा. दरेवाडी, ता . नगर , व इतर २० अनोळखी इसम यांच्याविरुद्ध भादवि कलम गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment