अहमदनगर ब्रेकिंग: वाळू तस्करांकडून महिला तहसीलदारावर हल्ल्याचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा: वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी निघालेल्या शिरूरच्या महिला तहसीलदार एल.डी.शेख यांच्यावर पाळत ठेऊन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.  या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या आरोपींपैकी एकाला शिरूर पोलिसांनी तर दुसर्‍याला गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली.

अशोक सहादू वाखारे (रा.वाखारवाडी, हिंगणी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर),स्वप्नील साहेबराव जाधव ( रामलिंग, शिरूर ) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे इतर साथीदार अद्याप पसार आहेत.

शुक्रवारी (दि.14) पहाटे साडेतीन वाजता शेख या कारवाईसाठी जात असताना त्यांच्या घराची हेरगिरी करून त्यांना दमदाटी केल्याच्या घटनेची फिर्याद शिरूर पोलिसांत तहसीलदार यांनी दिलेली असून वाळूतस्करांच्या या मुजोरीमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment