कर्जमाफीच्या निर्णयात शेतकऱ्यांची फसवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहाता : राज्यातील आघाडी सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयात शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असून, महिलांना सुरक्षा देण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. अशा निष्क्रिय सरकारच्या विरोधात तहसिल कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शन व्यक्त करण्यात आली.

विविध मागण्याचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. मागण्यांबाबत गांभिर्याने विचार करावा अन्यथा यापेक्षाही तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. भारतीय जनता पक्षाच्यावतीने तहसिल कार्यालयासमोर सकाळी १० वाजल्यापासून हे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारावर टिका करुन, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची घोषणा आघाडी सरकारने केली. मात्र सरकारच्या या घोषणेत शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारे २५ हजार रुपयांचे मदतीचे आश्वासनही हे सरकार पूर्ण करु शकले नाही. मागील युती सरकारने जनसामान्यांसाठी सुरु केलेल्या योजना जाणिवपूर्वक बंद करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला याचाही कार्यकर्त्यांनी निषेध केला. राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत.

या सरकारच्या काळातच महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याकडे आंदोलकांनी सरकारचे लक्ष वेधले. कृषीपंपाचे भारनियमन बंद करावे. सरपंचपदाची निवडणूक पुन्हा थेट जनतेतूनच घ्यावी अशा प्रमुख मागण्यांवर विविध वक्त्यांनी आपली मतं मांडली. या मागण्यांचे सविस्तर निवेदन तलसिदार कुंदन हिरे यांना देण्यात आले.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, भाजयुमोचे जिल्‍हाध्‍यक्ष सचिन तांबे, संजय सोमवंशी, बाळासाहेब चौधरी, तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, नगराध्‍यक्षा ममता पिपाडा, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, उपाध्‍यक्ष वाल्मिक गोर्डे, ज्ञानेश्‍वर गोंदकर, शिर्डीचे उपनगराध्‍यक्ष मंगेश त्रिभुवन, उपसभापती ओमेश जपे, सरचिटनिस बाळसाहेब चौधरी,

सिनेट सदस्‍य अनिल विखे, देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष सागर सदाफळ, भाजयुमोचे तालुका अध्‍यक्ष आशिष भगत, विजय सदाफळ, पुणतांब्‍याचे सरपंच डॉ.धनंजय धनवटे, शहराध्यक्ष अनिल बोठे, माजी उपसभापती सुभाषराव विखे, संचालक संजय आहेर, राजेंद्र दंडवते, सागर कापसे, सरपंच राजेंद्र धनवटे, सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, राजेंद्र वाबळे, संदीप लहारे, विजय सदाफळ, श्रीनिवास निकाळे, आदींसह आजी माजी जिल्‍हा परिषद, पंचायत समिती सदस्‍य, कारखान्‍याचे संचालक यांच्‍यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment