शौचालयासाठी बाहेर जाणाऱ्या महिलांची छेडछाड ; चौघांना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : रात्रीच्यावेळी शौचालयासाठी बाहेर जाणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्­या चौघांना भिंगार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बाकी पसार आरोपींचा भिंगार पोलिसांकडून शोध सुरू आहे.

शनिवारी (दि.२२) रात्री भिंगारमधील वडारवाडी भागात काही महिला शौचालयासाठी जात असताना रस्त्यावर उभा असलेल्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यावर महिलांनी आरडाओरडा केला. ओरडण्याचा आवाज येताच तेथे निलेश कोरडे व आकाश पवार हे दोघे आले.

त्यांनी या टोळक्यांना जाब विचारला असता त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली. सोमवारी सायंकाळी गुन्ह्यातील काही आरोपी भिंगारमध्ये असल्याची माहिती भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हवालदार राजेंद्र सुद्रीक, खेडकर, नगरे यांच्या पथकाने चौघांना अटक केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment