तालुक्यातील पाणी प्रश्न व के.के. रेंजचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : पोपटराव पवार यांनी हिवरेबाजारसह महाराष्ट्रातील विविध गावात जलसंधारणाचे केलेले काम केवळ राज्यालाच नव्हे तर देशाला मार्गदर्शक आहे.असे मत आमदार निलेश लंके यांनी केले. भाळवणी ग्रामस्थांच्यावतीने राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच भारत सरकारचा ‘आदर्श उद्योजक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल भाळवणीचे भुमिपुत्र गोरख (माऊली) रोहोकले व आ.निलेश लंके यांचा सामूहिक सत्कार केला.

त्याप्रसंगी आ. लंके बोलत होते. माजी सभापती केरूभाऊ रोहोकले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आ.लंके म्हणाले की, पारनेर- नगर मतदारसंघात दोन ‘पद्मश्रीं’ च्या मार्गदर्शनाखाली विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.

तसेच तालुक्यातील जनतेने मताधिक्याने निवडून दिले असून, येत्या पाच वर्षात तालुक्यातील पाणी प्रश्न व के.के. रेंजचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पोपटराव पवार म्हणाले की, मला भेटलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून गेल्या तीस वर्षांपासून गावातील लहान थोरांचा सहभाग तसेच राज्यातील शंभर आदर्श गावांचा आहे.

जलसंधारण ही जागतिक समस्या बनली असून, जर आतापासूनच प्रत्येक गावाने पाण्याचा योग्य वापर करून ताळेबंद ठेवला नाही तर भविष्यात बिकट स्थितीचा सामना करावा लागेल. यावेळी प्रसिद्ध चित्रकार व ढवळपुरी येथील रहिवासी प्रकाश बोरुडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संजीव भोर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, उद्योजक सुरेश धुरपते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव रोहोकले,नागेश्वर दिंडीचे अध्यक्ष मंजाभाऊ चेमटे, दगडूभाऊ कपाळे, सुर्यभान रोहोकले, भानुदास तरटे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बबलू रोहोकले, संभाजीराव आमले, दत्तात्रय कुलट, राहुल झावरे, गंगाराम रोहोकले, नानासाहेब रोहोकले, भागाजी खरमाळे, जयसिंग दावभट, संदीप रोहोकले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष रोहोकले यांनी सूत्रसंचालन केले, संभाजी रोहोकले यांनी प्रास्ताविक केले तर बाबाजी तरटे यांनी आभार मानले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment