पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नातील प्रवरानगर येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स सेन्टर प्रकल्पाचे यश …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहता: विज्ञानाचे प्रयोग मुलांनी स्वत: करून पाहिले, तर ते त्यांना चांगल्या पद्धतीने समजून येतात. परंतु त्यासाठी मुलांना ते करून पाहण्याची संधी बालवयातच मिळायला हवी, या साठी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शिक्षणाच्या सर्व सुविधा परिपूर्ण पद्धतीने मुद्दाम खेड्यातच निर्माण करताना आणखी एक पाऊल पुढे टाकून खेड्यातील मुलांमधील कुतुहल आणि वैज्ञानिक जिज्ञासेला आकार देण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने प्रवरानगर येथे नगर जिल्ह्यातील पहिल्या सायन्स सेंटरची उभारणी करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याच हस्ते सन २०१५ लोणी खुर्द येथिल सैनिक स्कूलच्या शेजारी साडेसात एकराच्या परिसरात या सायन्स सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले होते. केंद्र सरकार आणि प्रवरा शिक्षण संस्थेच्या सहभागातून अवघ्या एक वर्षाच्या आत डिसेंबर २०१६ मध्ये अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर,यांच्या नेतृत्वाखाली या सेंटर उभारणीची झाली. डॉ काकोडकर यांच्याच हस्ते या सेंटरचे उदघाटन होऊन मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर ग्रामीण भागात हे सायन्स सेन्टर उभे राहिले.

मिसाईलमॅन ‘ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर ‘ असे नाव या सेंटरला देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मुलांना ज्या प्रमाणात शहरात सुविधा मिळतात तस्याच शैक्षणिक सुविधा गावात मिळाव्यात हे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे पहिल्यापासूनच धोरण होते. मग ते विनाअनुदानतत्वावरील राज्यातील पहिले पॉलिटेक्निक ( तंत्रनिकेतन) असेल,मुलींसाठी स्वतंत्र गृहविज्ञान, संगणक ,फार्मसी, औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय),अग्री पॉलिटेक्निक( कृषी तंत्रनिकेतन) याबरोबरच सैनिकी स्कूल, क्रीडाप्रबोधिनी, स्पोर्ट कॉम्लेक्स असे वेगळे पण,महात्वाकांशी प्रकल्प खेड्यात सुरु करून ग्रामीण भागातील मुलांना वेगळ्या सुविधा निर्माण केल्या आहेत.

विद्यार्थ्यांना बालपणापासूनच विज्ञानाची गोडी लागावी, त्याच्यातील शोधक बुद्धिला चालना मिळावी हा मुख्य उद्देश या सायन्स सेंटरच्या उभारणी मागे विखे पाटील यांचा होता. राज्य सरकारचा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, कोलकाता येथील राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद तसेच मुंबईचे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आणि प्रवरा शिक्षण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नाने लोणी येथे कार्यरत असलेल्या या सायन्स सेंटरची मध्ये दररोज ६० विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदकांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञानाबद्दलची जिज्ञासा समक्ष पडताळुन पाहता येत आहे.

इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या सेंटरचा फायदा घेत आहे. राज्यातील कोणत्याही शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना लोणीचे सायन्स सेंटर खुले असून नाममात्र शुल्कामध्ये दररोज जिल्ह्यातील विदयार्थी आणि उदयाचे शास्त्रज्ञ विज्ञानातील संशोधनाचेधाडे गिरवत आहेत. वैज्ञानिक शोधांची अद्भुत दुनिया. असलेल्या या सायन्स सेंटर मध्ये सूर्य का उगवतो? रबर कसे बनते? लाकूड पाण्यात का तरंगते? आकाश निळे का दिसते? नूटनचे नियम, आर्किमिडीस चे सिद्धांत, प्लेटो आइन्स्टाइन आर्किमिडीस सॉक्रेटीस यांच्या पासून विज्ञानावर आधारित मनोरंजनातून विज्ञान शिकताना वर्गात जे शिकविले गेली ते प्रत्यक्ष करून बघण्याची संधी या सेंटर मुले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निर्माण झाली आहे.

वैज्ञानिक खेळाच्या माध्यमातून भविष्यात पक्ष्यांप्रमाणे हवेत झेपावणारे विमान… टाळीच्या आवाजावर काम करणारा रोबो… स्वतः बनवलेल्या दुर्बिणीतून घेतलेला आकाशाचा वेध … “यम्मी’ चॉकलेट्‌सचा टेस्टी बुके… जपानी आणि कोरियन बाहुल्या… आफ्रिकन ड्रम्स. हे सगळे भविष्यात अनुभवण्यास मिळणार आहे. शिक्षणाची पंढरी समजल्या प्रवरानगर येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेन्टर हे खेड्यातील उत्साही बच्चे कंपनीची. मनोरंजनातून विज्ञान शिकण्याबरोबरच स्वतःच्या हाताने रोबोपासून दुर्बिणीपर्यंत उपकरणे बनवण्याची अनोखी संधी घेऊन येणारे ठरेल .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment