राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ‘महिला स्वसंरक्षण’ कार्यक्रम संपन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नगर: रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात सावित्री मैत्रेयी फोरम व क्रीडा विभागामार्फत विद्यार्थीनी व्यक्तिमत्व विकास, निर्भयता, सक्षमीकरण तसेच स्वसंरक्षणार्थ ‘महिला स्वसंरक्षण कार्यक्रम’ दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी महाविद्यालय प्रागंणात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व कराटे प्रशिक्षिका कु.राजश्री अल्हाट यांनी विद्यार्थीनीना महिला आयोग, महिलांना असलेल्या संवैधानिक व न्यायिक अधिकार याविषयी सविस्तर माहिती दिली.

तसेच  महिला स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ भाऊसाहेब औटी हे होते.त्यांनी विद्यार्थीनीनी सक्षम आणि स्वावलंबी बनावे असे मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे  स्वागत व प्रास्ताविक डाॅ.योगीता रांधवणे यांनी केले तर आभार प्रा.विलास एलके यांनी मानले.कार्यक्रमास उपप्राचार्य डाॅ.मनोहर करांडे ,प्रा.सहदेव आव्हाड,डाॅ.शंकर केकडे ,डाॅ.रूपाली एंडाईत , प्रा.चौधरी , प्रा.अंबेकर व मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment