अहमदनगर ब्रेकिंग : बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीगोंद्यात बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धककादायक घटना समोर आली आहे.मयताने आत्महत्येपूर्वी बायको व सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहले आहे.

अमोल शिंदे असे मयताचे नाव असून याप्रकरणी अमोलचे आई -वडील मीना चंद्रकांत शिंदे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पत्नी काजल शिंदे, सासरा दत्तू मेटे, सासू निर्मला मेटे, रा. आढळगाव, मेहुणी सोनी गायकवाड रा. थेरगाव तालुका कर्जत, मावज सासू रुक्मिणी जाधव रा. चोराची वाडी तालुका श्रीगोंदा यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील मीना शिंदे व चंद्रकांत शिंदे यांचा अमोल शिंदे या एकुलत्या एक मुलाचा विवाह आढळगाव येथील दादा दत्तू मेटे यांची मुलगी काजल हिच्याशी दीड वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर दोघेही कामानिमित्त सुरत येथे राहत होते.

मात्र, काजल शिंदे हिचे सतत अमोल याच्याशी भांडण होत असे. तसेच अमोलच्या सासरच्यांनी अमोलच्या मेहुण्याच्या लग्नासाठी मागे तकादा लावून दोन लाख 70 हजार रुपये घेतले. हे पैसे परत करण्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. पैकी 70 हजार रुपये अमोल यांच्या कानाच्या ऑपरेशनसाठी परत केले होते.

त्यानंतर यात्रेनिमित्त अमोल हा काजल हिच्यासह पुम्हा येळपणे येथे आला होता. मात्र, दोघांमध्ये सतत वादावादी होत असे. तसेच काजल वि अमोलच्या सासरची मंडळी अमोल यांना सतत शिविगाळ करून मानसिक त्रास देत असत. अमोल यांनी आता पुन्हा सुरतला जाणार नसून येथेच शेती करणार असल्याचे काजलला सांगितले.

…तुमच्या मौतीलाही येणार नाही

यावरून काजल आणि अमोल यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यामुळे 23 फेब्रुवारी रोजी काजलने आपल्या वडिलांना बोलावून घेतले. काजलचे वडील दादा मेटे यांनी अमोल यांना शिविगाळ करत तुम्ही पुन्हा सुरतला जाणार असताल तरच काजलला इथे ठेवणार नाहीतर मी तिचे दुसरे लग्न लावून देतो, तसेच तुमच्या मौतीलाही येणार नाही, असे म्हणत काजल हिला घेऊन गेले.

त्यानंतर अमोल शिंदे आपण पत्नी काजल व सासरच्यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवत आई-वडील शेतावर गेले असता घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment