अहमदनगर ब्रेकिंग : शिवद्रोही श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर आणि अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला सरकारने मोठा दणका दिला आहे.

सरकारकडून श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने त्याचे पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता. छिंदम निवडणुकीला उभा राहिला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचे त्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. मात्र, त्या निवडणुकीत त्याचा विजय झाला.

त्यानंतर त्याने छत्रपतींना अभिवादन करून परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही शिवप्रेमींच्या मनातील राग काही कमी झालेला नाही. शिवसेनेसह सर्व पक्षांनी त्याच्या विरोधात मोर्चा काढला होता.

त्याची हकालपट्टी करावी यासाठी भाजप नगरसेवकही आग्रही होते.दरम्यान श्रीपाद छिंदम प्रकरणी नगरविकास विभागाने 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी केली,

त्यावेळी छिंदम यांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र छिंदम हजर राहिला नाही. त्यामुळं आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात छिंदम याबाबत सुनावणी झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment