दगडाला पाझर फुटणारी घटना; आत्महत्या करू नका, असे आवाहन करणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनीच केली आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असे कवितेतून आवाहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनीच केली रात्री आत्महत्या पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक घटना दगडाला पाझर फुटणारी घटना.

पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरातील भारजवाडी येथील हनुमान नगर जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थी प्रशांत बटुळे याने काल बुधवारी दुपारी शाळेत कार्यक्रमात शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, म्हणून एक कविता स्वतःहून सादर केली.

शेतात राबराब राबणा-या बापाला त्याचा चिमुकला लेक रोज भरल्या डोळ्याने पाहत होता़. बापाचे हेच कष्ट त्याने शब्दबद्ध केल. अन् शाळेत ‘अरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर केली. ज्या दिवशी मुलाने कविता सादर केली त्याच रात्री बापाने विष पिऊन आत्महत्या केली. लेकाची आर्त हाक बापाला ऐकायलाच गेली नाही.

मल्हारी बाबासाहेब बटुळे (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतक-याचे नाव आहे़ भारजवाडी येथील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी (दि़.२७) मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कविता वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मयत मल्हारी यांचा मुलगा प्रशांत हा इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेतो. या कार्यक्रमात प्रशांत याने ‘शेतात कष्ट करूनही तुज्या डोक्याला ताप, आरे बळीराजा नको करू आत्महत्या, पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरं, कसे उन्हात करतात.

शेती पीक उगवणी मिळतात. पैसे, शेती करुनही तुज्या हाताला फोड आरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर करून शेतक-यांची व्यथा आणि वेदना मांडली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment