आश्वासन देणारे मंत्री प्रत्यक्षात कृती मात्र अन्यायाची करत आहेत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहुरी :- सत्तेत आलेल्या मंत्र्यांनी देसवंडीच्या बंधाऱ्याच्या माध्यमातून एकाच्या तोंडातला घास हिसकावून दुसऱ्याचे पोट भरण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की मंत्र्यांचे असा सवाल देसवंडीच्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

अन्यायग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा देसवंडी बंधाऱ्याला विरोध नसून त्याची जागा बदलल्यास अन्यायग्रस्त भागातील शेतकऱ्यांनाही या बंधाऱ्याचा फायदा होईल, असे मत व्यक्त केले आहे.

बंधाऱ्याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन देणारे मंत्री प्रत्यक्षात कृती मात्र अन्यायाची करीत असल्याची आरडगांव, तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव भागातील शेतकऱ्यांची भावना आहे. याबाबत शिष्टमंडळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याचे राहुरी तालुका दूध संघाचे अध्यक्ष अँड. तान्हाजीराव धसाळ यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर पद्धतीचा मानोरी बंधारा हा केंदळ येथील पुलाची उंची कमी असल्याने पुर्ण क्षमतेने भरला जात नसल्याने कोंढवड, तांदुळवाडी येथील मुळा नदीवर बंधारा बांधण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी 2018 पासून सातत्याने केली.

त्याचा पाठपुरावा करून जलसंपदा विभागाकडे तसेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संबंधित मागणीची दखल घेवून जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आय. एस. चहल यांना कारवाई करण्याची सुचना केल्या होत्या.

परंतु जनतेला विरोधात असल्याचे भासविणाऱ्या राहुरीतील नेत्यांनी एकत्रीत येत देसवंडी बंधाऱ्याची मागणी तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडे केली.कोल्हापूर पद्धतीचा मानोरी बंधारा पुर्ण क्षमतेने भरला जात नसल्याने त्यातील शिल्लक पाणीसाठा देसवंडी बंधाऱ्यासाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने सादर करून पाणीसाठ्याचे प्रमाणपत्र जुन 2019 मध्ये देण्यात आले.

याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी हार न मानता महाआघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असे वाटल्याने नवनियुक्त मंत्र्यांकडे बंधाऱ्याची जागा बदलण्याची मागणी केली.परंतु मंत्र्यांच्या वडीलांचे देसवंडी बंधाऱ्यावर पर्यटनस्थळ करण्याचे स्वप्न असल्याने त्यांनीही या भागातील शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवल्याने हे सरकार शेतकऱ्यांचे की मंत्र्यांचे असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment