तृतीयपंथीयांच्या सहभागाचा फंडा मनपाच्या अंगलट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- तृतीय पंथीय संघटनेला विश्­वासात न घेता किंवा कुठलीही माहिती न देता मालमत्ता करवसुलीसाठी तृतीयपंथीयांचा सहभाग घेणार असल्याचे परस्पर प्रसिद्धीपत्रक काढून तृतीय पंथीयांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शहरातील तृतीय पंथीयांनी सोमवारी (दि.२) महापालिकेवर मोर्चा नेवून उपायुक्तांना याचा जाब विचारला.

तृतीयपंथीय संघटनेचे अध्यक्ष काजलगुरू यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तृतीयपंथीयांनी महापालिकेत निदर्शने करुन उपायुक्तांना घेराव घातला. महापालिका प्रशासनाने दोन दिवसांपुर्वी शहरातील थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी थकबाकीदारांच्या दारात ढोल-ताशा व बॅण्ड वाजविणार तसेच थकबाकी वसुलीसाठी शहरातील तृतीयपंथीयांची मदत घेणार असल्याचा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला होता.

मात्र, प्रशासनाने हे प्रसिद्धीपत्रक काढण्यापुर्वी तृतीयपंथीय संघटनेशी कुठलाही संपर्क केलेला नव्हता तसेच तृतीयपंथीय संघटनेला विश्­वासात न घेता परस्पर घोषणा केल्यामुळे तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या आहेत.

तृतीयपंथी संघटना महापालिकेच्या थकबाकी वसुलीचे कुठलेही काम करणार नाही, यापुर्वीही असे काम केलेले नाही तसेच पुढील काळातही करणार नाही, असे असतानाही प्रसिद्धीपत्रकाद्वारे तृतीय पंथीयांच्या भावना दुखवत अवमान केल्याप्रकरणी लेखी खुलासा द्यावा, अशी मागणी यावेळी उपायुक्तांकडे करण्यात आली. उपायुक्तांनी जाहीर दिलगीरी व्यक्त केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment