उसने पैसे मागितल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उसने पैसे मागितल्याच्या रागातून तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना झारेकर गल्लीत घडली. महेश अशोक चव्हाण (२९, आदर्श नगर, कल्याण रोड, नगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रविंद्र सुरेश बारस्कर, आशा रवींद्र बारस्कर, सागर सुरेश बारस्कर, निखिल कैलास बारस्कर, अविनाश सुरेश बारस्कर (सर्व रा. झारेकर गल्ली, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चव्हाण हे काही जणांसोबत रविंद्र बारस्कर याच्याकडून उसने दिलेले पैसे आणण्यासाठी गेले होते. मात्र, पैसे मागितल्याचा राग आल्याने बारस्कर व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment