मुलीच्या शोधासाठी आईवडीलांचे पोलीस ठाण्यासमोर उपोषण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर : तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील अल्पवयीन तरुणीला येथील एका तरूणाने पळून नेले आहे. मागील दहा महिन्यांपासून या मुलीचा कोणताही तपास लागत नसल्याने तिचे आईवडील आश्वी पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसले आहेत.

याबाबत पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या मुलीला घरासमोर राहत असलेल्या कुटुंबातील एक तरुण त्रास देत होता. याबाबत त्याच्या कुटुंबाला सांगितले असता त्यांनी आम्हाला गावात राहू देणार नाही असा दम दिला. त्यामुळे आम्ही ते घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेलो. सदर तरूण व त्याच्या मित्रांनी दि. १२ जून २०१९ रोजी मुलीला पळवून नेल्याची माहिती त्यानेच फोनवरून दिली.

याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दहा महिने उलटूनही मुलीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे मुलगी परत मिळावी यासाठी आईवडिल बेमुदत उपोषणाला बसले आहेत. पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी भेट घेऊन मुलीचा सर्वत्र शोध सुरु असून उपोषण करू नका, अशी विनंती केली.

मात्र, दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने दोघाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय लाटे, विनोद गंभीरे, गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेगाळे, महिला पोलीस छाया बढे आदी लक्ष ठेवून आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment