अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस उपनिरीक्षकांची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर :- शहरातील बेलापूर रेल्वे स्टेशनचे रेल्वे पोलीस फोर्सचे पोलीस उपनिरीक्षक मिनीचंद मिना, वय ४० यांचा मृतदेह आज गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांच्या श्रीरामपुरातील रहात्या घरात आढळून आला.मीना हे राजस्थान मधील अलवर या गावातील रहिवासी होते.

या घटनेने रेल्वे पोलिसांसह कर्मचाऱ्यांमध्ये व नागरिकांत एकच खळबळ उडाली असून एवढ्या मोठया पदावर काम करणाऱ्या या रेल्वे अधिकाऱ्याने गळफास का घेतला ? कधी घेतला ? कोणत्या कारणाने घेतला ? अशी चर्चा आता रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

पोलीस उपनिरीक्षक मिना हे स्पोर्ट ड्रेस वरती असून सुताच्या दोरीने छताला गळफास घेतलेला असून पायाखाली चॉकलेटी रंगाची प्लॅस्टीकची खुर्ची पडलेली आहे. या घटनेची खबर मिळताच नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना खबर दिली.

बंगला मीना यांनी भाडोत्री घेतला होता. त्यात ते रहात होते, गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह खिडकीतून दिसत होता. दुपारी उशिरा पोलीस कर्मचारी हापसे व इतर कर्मचारी दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडून मृतदेह पंचनाम्यासाठी काम करत होते.

मीना हे रेल्वे पोलीस अधिकारी असल्याने श्रीरामपुरात त्यांचा अनेकांशी परिचय होता . त्यांनी अचानकपणे एवढ्या टोकाचे पाऊल का व कसे उचलले ? याचा सर्वानाच धक्का बसला . सर्वच रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी मीना यांच्या या अकस्मात निधनाने शोक व्यक्त केला आहे.

काल रात्री 1 वाजेपर्यत मीना हे मित्रासोबत गप्पा मारत होते. सकाळी आठ वाजता मिना यांना उठविण्यासाठी कर्मचारी गेले होते. दरवाजा उघडला नसल्याने ते परत गेले. ऑफिसला का आले नाही म्हणून पुन्हा दोन कर्मचारी घरी गेले. दरवाजा वाजविला.

पण दरवाजा उघडला नाही म्हणून मागील बाजूच्या खिडकीतून पाहिले असता, मिना हे गळफास घेतलेल्या आवस्थेत दिसले. तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा तोडला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांचे पार्थिव अलवर येथे पाठविण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment