अहमदनगर ब्रेकिंग : उच्च शिक्षित तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील 21 वर्षीय उच्च शिक्षित इंजिनिअर तरूणीने राहत्या घरातील बाथरूम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.

ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. तरूणीचे नाव विद्या बापू भांड (वय 21) असे असून मराठी व इंग्रजीमध्ये दोन स्वतंत्र चिठ्ठ्या तिने लिहलेल्या आढळल्या आहेत.

त्या चिठ्ठीत वासुंदे येथील एका मुलाचा उल्लेख असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

त्यामुळे ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली की इतरकाही कारणाने झाली याचे कारण अद्यापतरी गुलदस्त्यातच आहे.

यासबंधीची खबर मुलीचा चुलत भाऊ दत्तात्रय भांड यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली.

 या घटनेतील धोत्रे येथील उच्च शिक्षित तरुणी रांजणगाव येथील एका कंपनीत नोकरीला होती.

मंगळवारी तरूणीचे आई-वडील हे शेतात काम करण्यासाठी गेले असता सायंकाळी सहा वाजता घरी परतले असता त्यावेळी मुलीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment