धक्कादायक : फक्त १५ हजार रुपयांसाठी मित्राला ११ व्या मजल्यावरुन ढकलून देत हत्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  फक्त १५ हजार रुपयांसाठी इंजिनियरिंगच्या मित्राला ११ व्या मजल्यावरुन ढकलून देऊन खून केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.

सागर चिलवेरी असे मृत युवकाचे नाव असून त्याच्या मित्रांनीच हत्या केली.पुण्यातल्या कोंढवा भागात ही धक्कादायक घटना घडलीये.

सागर चिलवेरी या तरुणाला कुल उत्सव सोसायटीच्या 11व्या मजल्यावरून ढकलून देण्यात आलं. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी अभिनव जाधव, अक्षय गोरडे आणि तेजस गुजर यांना अटक केलीये.

“हे तिघंही इंजिनियरिंगचे विद्यार्थी आहेत. ज्याचा मृत्यू झाला तो सागर चिलवेरी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करायचा.

सागरने त्यांच्याकडून जानेवारीमध्ये १० टक्के व्याजाने १५ हजार रुपये घेतले होते. तीन महिने झाले तरी त्याने हे पैसे परत केले नव्हते. 

शिवाय या तीनपैकी दोन मुलं आणि सागर हे मार्चपासून एकाच खोलीत रहात होते. पैशावरून त्यांच्यात सोमवारी रात्री वाद झाला.

त्यानंतर पहाटे कुल उत्सव सोसायटीतील ११ व्या मजल्यावरील घरात गेल्यानंतर त्यांनी त्याला मारहाण करुन ११ व्या मजल्यावरुन ढकलून दिले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment