कोरोनामुळे 15 दिवस शासकीय कार्यक्रम रद्द

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- कोरोनाचे संकट उंबरठ्यापर्यंत आले आहे, मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी नगरकर एकवटले आहेत. प्रशासन, डॉक्टर, सामाजिक संस्था आणि नागरिक आपापल्या परीने खबरदारी घेत असून जनजागृतीही सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर 15 दिवस शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मोठ्या यात्रा, उत्सव या ठिकाणी दक्षता घेण्याचे आदेश जिल्हधिकार्‍यांनी दिले आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार बैठका घेऊन दक्षता घेण्याच्या सूचना देत आहेत.

कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रम, मेळावे येत्या 15 दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.

तसेच नगरमध्ये या काळात होणारे खासगी उत्सव, सण, वाढदिवसांच्या पार्ट्या, लग्न समारंभ या ठिकाणी शक्यतो गर्दी करू नये, नागरिकांनी कोरोनासंदर्भात दक्षता घ्यावी, मोठ्या यात्रा उत्सव या ठिकाणी देखील दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, कोरोना व्हायरसचे आव्हान आहे. जिल्ह्यात गुरूवारपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वप्रथम शासकीय पातळीवर जिल्ह्यामध्ये होणारे सर्व कार्यक्रम पंधरा दिवसांसाठी रद्द केले आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या यात्रा, उत्सव आणि लग्न समारंभ सुरू आहे. या समारंभात जनतेने गर्दी करणे टाळले पाहिजे.

जनतेचे नियमांचे पालन केले पाहिजे. सूचना देऊनही काही ठिकाणी कार्यक्रम होणार असतील तर तेथे प्रसंगी प्रशासकीय पातळीवर निश्चितपणे कर्यावाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. बंदी घालण्यापेक्षा एखादा कार्यक्रम रद्द करण्याची नागरिकांनी स्वतःहून विचार केला पाहिजे, असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment