खासदार रावसाहेब दानवे यांच्या मुलीवर गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध, अर्थात रावसाहेब दानवे यांच्या मुलीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

माजी आमदार व मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद टोकाला गेला आहे. जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी त्यांची सून व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्यावर शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

शनिवारी त्यांनी थेट औरंगाबादेतील क्रांती चौक पोलिस ठाणे गाठत ही तक्रार दाखल केली. त्यावरून संजना यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सुन संजना हर्षवर्धन जाधव यांनीही रात्री सासू तेजस्विनी जाधव यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तेजस्विनी जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी श्रीराम कॉलनीत ११ वाजता घरात असताना सून संजनाने किरकोळ कारणावरून मला शिवीगाळ करून धमकी दिली. तिच्या वागण्यामुळे जगणे असह्य झाले असून तिच्यावर कारवाई करावी.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment