‘त्या’ बलात्कार प्रकरणात शिर्डीच्या उपनगराध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डीत एका तरुणासह कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील धक्कादायक माहिती म्हणजे या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये शिर्डीच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन यांचा समावेश आहे.

पीडित तरुणीने शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिर्डी येथील आकाश रमेश त्रिभुवन याने लग्नाचे आमिष दाखवून शिर्डी व पुणे येथील हॉटेलवर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून शिवीगाळ केली.

या प्रेमसंबंधात व शरीरसंबंधात आकाशच्या कुटुंबातील रमेश वामन त्रिभुवन, मंगेश वामन त्रिभुवन, राजेंद्र वामन त्रिभुवन, संजय वामन त्रिभुवन यांना सगळे माहीत असताना त्यांनी आकाशला फितवून संगनमत करून लग्नाला नकार देऊन फसवणूक केली.

शिर्डी पोलिसांत पीडित तरुणीच्या या फिर्यादीवरून संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व दातरे हे करीत आहेत.

यादरम्यान यातील पीडित तरुणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. साईबाबा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. तिची प्रकृती आता स्थिर आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment