श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शिवारात दोघांवर तलवारीने हल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शिवारात दोघांवर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना १२ मार्च रोजी घडली.

या हल्ल्यात संदीप रामदास गायकवाड व रामदास बाळू गायकवाड हे दोघे जखमी झाले आहेत .

दीपक सुरेश ससाणे यांनी १३ मार्च रोजी बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार आदेश बाळू गायकवाड ( रा.नारायण गव्हाण) , सागर विनोद ससाणे व चेतन कदम ( दोघे रा.देवदैठण ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जखमी संदीप व रामदास हे त्यांच्या घरी बसलेले होते. तेथे आरोपी मोटारसायकलवर आले.

जुन्या वादाच्या कारणावरुन आरोपींनी रामदास गायकवाड याच्या डोक्यात कोयता मारला त्याचप्रमाणे तलवार मारुन जखमी केले.

तसेच संदीप गायकवाड यांनाही मारहाण करण्यात आली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment