कोरोना व्हायरसमुळे भारतात कंडोमच्या विक्रीत वाढ ! Corona virus increases condom sales in India!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लॉकडाऊन झाल्यापासून कंडोमच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
ही वाढ तब्बल 50% झाली असल्याच औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
तर प्रमुख मोठ्या शहरांमध्ये कडक बंद पाळण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने दिलेल्या या आदेशाचा अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.
असे असतानाचा मेडिकल क्षेत्रातून हा खळबळजनक रिपोर्ट समोर आला आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे अनेकजण हे घरी आहेत. त्यामुळे प्रत्येकजण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवत आहे.
अन्नधान्य, औषध, भाजीपाला आदि गोष्टींचा नागरिक साठा करून ठेवत आहेत.
त्यात आता नागरिकांनी कंडोमच्या खरेदीलाही पसंती दिली आहे. अनेक मेडिकल स्टोअर्सच्या मालकांनी याबाबत माहिती दिली आहे.
आतापर्यंत कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोमची विक्री झाली नव्हती. मात्र आता दिवसाला कंडोमच्या विक्रीत 50% वाढ झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment