खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश ! Success of the efforts of MP Sujay Vikhe Patil

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असणारा कापूरवाडी तलाव गेल्या अनेक वर्षापासून लष्कराच्या ताब्यात होता. नगर तालुका व परिसराच्या पिण्याच्या व जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या तलावातील गाळ काढण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून स्थानिक लष्करी प्रशासनाकडे प्रलंबित होती.

कापूरवाडी तलाव हा लष्कराच्या ताब्यात आहे . या तलावातून पूर्वी भुयारी पाइपलाइनद्वारे लष्कराच्या घाटापर्यंत पूर्वी पाणी दिले जात होते. कापूरवाडी, नागरदेवळे, बुऱ्हाणनगर भिंगार आणि इतर बारा गावांसाठी पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची सोय सुद्धा या तलावातून पूर्वी होती.

स्वातंत्र्यानंतर लष्कराच्या अखत्यारीत हा तलाव आला आला. यापूर्वी देखील लोकप्रतिनिधींनी व जनतेने वेगळा निवेदने देऊन सुद्धा रक्षा मंत्रालयाने मात्र याबाबत कधीही परवानगी दिलेली नव्हती! मात्र खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयाला या संदर्भात विस्तृत सादरीकरण केल्यानंतर रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी लष्करी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देऊन कापूरवाडी तलावातील गाळ काढण्यास अखेर मान्यता दिली आहे.

या संदर्भात नुकताच पत्रव्यवहार प्राप्त झाला असून परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या प्रश्न अखेर मार्गी लागल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसाच्या लोक डाऊन नंतर या संदर्भात संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे व लष्कर प्रशासनातील वरिष्ठांची बैठक घेऊन गाळ काढणे संदर्भात आवश्यक तो लोकसहभाग व इतर पूरक बाबींच्या पूर्ततेबाबत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे खा. विखे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment