अहमदनगरकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या पहिल्या बाधित रुग्णाची 14 दिवसानंतर घेण्यात आलेली स्त्राव नमुना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

उद्या पुन्हा त्या रुग्णाचा स्त्राव चाचणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात येणार आहे.

आज या रुग्णासह एकूण आठ रुग्णांची चाचणी अहवालही निगेटीव आले आहेत.

जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

जीवनावश्यक वस्तूंची सेवा व पुरवठा कोठेही विस्कळीत होऊ नये,

त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी अनेक नागरिक जमा होऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यंत्रणा आता एकजुटीने या संकटाचा सामना करीत असल्याचे चित्र आहे.

सोशल डिस्टंसिंग राखून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल, यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊनही त्यासाठीची सज्जता केली जात आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात गुरुवारी रात्री महत्वाच्या यंत्रणांची बैठक घेऊन त्याप्रमाणे कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment