भारतीय रेल्वे वैद्यकीय सेवेसाठी सज्ज ! ८० हजार खाटांची व्यवस्था केली जाणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नवी दिल्ली : कोरोना संकटाविरोधात जगभर लढा सुरू असताना रेल्वेनेही आपली भव्य ताकद या कार्यात झोकून देण्याच्या दिशेने अभूतपूर्व तयारी केली आहे. या संकटात वैद्यकीय सेवेसाठी सज्ज होत २० हजार डब्यांचे अलगीकरण वॉर्डात रूपांतर करण्याची योजना रेल्वेने आखली आहे.

त्यानुसार जवळपास ३.२ लाख रुग्णांना यामध्ये वेगळे ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. लॉकडाऊनदरम्यान, देशभरातील प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या १६ झोनमधील हजारो रेल्वे गाड्यांचा वैद्यकीय सेवेसाठी सदुपयोग करण्यासाठी रेल्वे विभागाने अभूतपूर्व योजना आखली आहे.

या योजनेनुसार कोरोना संक्रमित वा संशयित रुग्णांवरील उपचारासाठी रेल्वे गाड्यांच्या तब्बल २० हजार डब्यांचे अलगीकरण तसेच विलगीकरण कक्षात रूपांतर करण्याची जंगी तयारी सुरू करण्यात आली आहे. या डब्यांमध्ये तब्बल ३ लाख २० हजार रुग्णांची, त्यांच्या बिछान्याची व्यवस्था होऊ शकते. रेल्वेच्या १६ झोनपैकी तेलंगाणातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय या कार्यात आघाडीवर आहे.

मुख्यालयाकडून ४८६ डब्यांचे रूपांतर करण्याला मंजुरी दिली आहे. यापाठोपाठ मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाने ४८२ डब्यांना मंजुरी दिली आहे. पाच हजार डब्यांचे अलगीकरण वॉर्डमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ८० हजार खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment