कोरोनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने ‘त्याला’ पोलिसांनी केली अटक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- इन्फोसिस कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर कोरोना व्हायरसबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. 

कंपनीने तत्काळ या सगळ्याची दखल घेत  कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकलंय. कर्नाटक पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.

मुजीब मोहम्मद असे या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
या पोस्टमध्ये, “या…सगळ्यांनी एकत्र या…बाहेर निघा…आणि उघड्यावर शिंका व व्हायरस पसरवा”, अशा आशयाचा संदेश होता.
याप्रकरणी शुक्रवारी कर्नाटक पोलिसांनी , ‘‘ज्या व्यक्तीने लोकांना उघड्यावर शिंकण्यास आणि व्हायरस पसरवण्याचं आवाहन करणारी पोस्ट केली होती, त्याला अटक करण्यात आलं आहे.
त्याचं नाव मुजीब असून तो इन्फोसिस या एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो” अशी माहिती दिली होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.co

Leave a Comment