‘या’ देशात कोरोनाचे थैमान २४ तासांत ९१३ दगावले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  स्पेनमध्ये कोरोनाने थैमान घातला असून, सोमवारी स्पेनमध्ये ९१३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ७ हजार ७१६ वर पोहचली आहे. 
दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे युरोपामध्ये २५ हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे एएफपीने संकलित केलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
गेल्या २४ तासांत बळींची आणि रुग्णांची संख्या घटल्याचा दावा प्रशासन करत असतानाच सोमवारी मृतांची संख्या वाढली. स्पेनमध्ये रविवारी ८३८ जणांचे बळी गेले होते.

सोमवारी, ७८४६ जणांना कोरोनाची बाधा असल्याचे आढळून आले. त्यामुळे स्पेनमध्ये रुग्णांची संख्या सुमारे ८८ हजार झाली आहे. युरोपमध्ये तीन लाख ९९ हजारहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment