अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात चोरट्यांचेच झाले एप्रिल फूल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्वत्र संचारबंदी असतानाही मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास कुकाण्यात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.

पण नागरिकांच्या जागरूकपणापुढे चोरट्यांच्या टोळीला पळ काढावा लागल्याने नागरिकांच्या प्रसंगावधानपणाने चोरट्यांचे एप्रिल फुल झाले.

मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास वंदेमातरम नगरात चोरटयाच्या टोळीने प्रवेश केला त्याच वेळी या नगरतील कुत्रे जोराने भुंकत असल्याने नागरिकंाना संशय आला.

चौघा चोरट्यांची टोळी या नगरतील रहिवाशांच्या दृष्टीस पडताच गावात मोबाइलद्वारे सर्वत्र चोरटे आल्याची माहिती नागरिकांनी कळवली. चोरटे बाजारतळमार्गे टेलिफोन कार्यालयाजवळून जुन्या पेठेजवळ गेले व तेथून स्मशानभूमी रस्त्याने तरवडी रोडकडे पळाले.मात्र, चोरट्यांच्या भीतीने जागूनच काढावी लागली.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment